Wednesday, December 25, 2024

/

हनुमाननगर श्री हनुमान मंदिरामध्ये चोरी : 10 किलो चांदीचे दागिने लंपास

 belgaum

हनुमाननगर येथील श्री हनुमान मंदिरामध्ये आज सकाळी चोरीची घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी मंदिरातील 10 किलो चांदीचे दागिने लंपास केले आहेत.

चोरट्यांनी बेळगाव ग्रामीण भागातील मंदिरांना लक्ष्य केले आहे असे म्हंटले जात असताना आता त्यांनी आपला मोर्चा शहर व उपनगरातील मंदिराकडे वळविल्याचे दिसून येत आहे. शहरातील हनुमाननगर येथील श्री हनुमान मंदिरातील चोरीची घटना आज सकाळी पुजार्‍यांनी मंदिर उघडले त्यावेळी उघडकीस आली. चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा कापून मंदिरात प्रवेश केला आणि 10 किलो चांदीचे दागिने लांबविले आहेत.

सदर घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापूरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनाम्यानंतर ठसे तज्ञ व श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले. मात्र श्वानपथक मंदिरापासून कांही अंतरावर जाऊन तेथेच घुटमळले. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.