बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने स्मार्ट सिटी प्रकल्पांची सद्यस्थिती जाहीर केली असून २३ नोव्हेंबर २०२० पर्यंत एकूण मंजूर निधी पैकी वापर करण्यात आलेल्या निधीचा आणि पूर्ण झालेल्या कामांचा तपशील जाहीर केला आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराचा विकास करण्यात येत आहे. या विकासकामांमधील अनेक ठिकाणची विकासकामे पूर्णत्वास आली आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
एकूण ४९४ कोटी रुपये निधीपैकी ३४०.४२ कोटी रुपयांचा खर्च या विकासकामांसाठी करण्यात आला असून या योजनेंतर्गत ११८ प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
बेळगाव शहराला स्मार्ट सिटी म्हणून २०१४ मध्ये जाहीर करण्यात आले होते. देशातील स्मार्ट सिटीच्या यादीतील पहिल्या यादीत बेळगाव शहराचा समावेश करण्यात आला होता.
त्यानंतर २५ जून २०१६ नंतर या विकासकामांना प्रारंभ करण्यात आला होता. एकूण २२२ प्रकल्पांपैकी ११८ प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत.