राज्य सरकार 17 नोव्हेंबरपासून अभियांत्रिकी डिप्लोमा पदवी पदव्युत्तर महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र शाळेत जाताना विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आल्याने पुन्हा अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना महामारी थोपवण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न योग्य असला तरी त्याचे गांभीर्याने पालन करणे ही गरजेचे आहे. कोरोना परिस्थितीमुळे बंद असणारे शाळा महाविद्यालय सुरू करण्याबाबत राज्य सरकारने तयारी सुरू केले आहे. त्यामुळे यापुढे विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनाही कोरोना चाचणी सक्तीचे करण्यात आली आहे.
मात्र सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याची सक्तीही करण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात शाळा सुरू होतील मात्र त्यासाठी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आले आहे. दरम्यान महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना ही सक्ती असणार आहे. त्यामुळे शाळेत जाताना आता कोरोना चाचणी आवश्यक करण्यात आल्याने सोयीचे ठरणार आहे. आसन व्यवस्था करताना विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फूट अंतर असणे गरजेचे आहे. स्वच्छता शुद्ध पेयजल निर्जंतुकीकरण करण्यासाठी ही शासनाने अट घातली आहे.
खाजगी वाहने महाविद्यालयाच्या बसेसचे नियमित त्यांचे निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना आरोग्य हितासाठी आरोग्य समिती स्थापन करण्यासंदर्भात हालचाली गतिमान करण्यात आले आहेत. महाविद्यालय आवारात येण्यावर निर्बंध असणार आहेत. त्यामुळे शाळा सुरू करताना आता विविध अटी आणि नियमांचे पालन करावे लागणार यात शंका नाही.
आवश्यकतेनुसार महाविद्यालयीन वेळेत बदल किंवा वाढ करण्याची मुभा असणार आहे. वर्गखोल्या जागेची उपलब्धता याच्या आधारे 50 टक्के विद्यार्थ्यांना एका वेळी हजर करण्यात येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बेळगावातही या दृष्टिकोनातून हालचाली गतिमान करण्यात आले आहेत. सर्व सूचना बेळगाव येथील महाविद्यालयीन कॉलेज यांना देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.