कोरोना महामारी मुळे सुरक्षित अंतर राखण्यासाठी अनेक कार्यालयात आवाहन करण्यात येत आहे. मात्र याकडे नागरिक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी हा धोका हिवाळ्यात वाढण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली असली तरी याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास नागरिकच दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
आरटीओ कार्यालयात असेच प्रकार सुरू आहेत. वारंवार सांगून देखील नागरिक याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आरटीओनी आता सांगून नागरिकांसमोर हात जोडण्याचे शिल्लक राहिले आहे. मात्र नागरिकांना याचा काहीच फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. आरटीओ कार्यालयात वेगवेगळ्या कामांसाठी नागरिक दररोज गर्दी करत असतात.
वाहन परवाना याबरोबरच वाहन नोंदणी आणि इतर बरीच कामे करण्यासाठी नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असते. मात्र कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली भीती सध्या नागरिकांमध्ये नसल्याचे दिसून येत आहे. वारंवार सांगून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सुरक्षित अंतर सॅनिटायझर आणि बरेच नियम पाळण्याची गरज आहे. मात्र आरटीओ कार्यालयात नागरिकच या नियमांची पायमल्ली करत असल्याचे दिसून येत आहे.
आरटीओ दिवसातून तीन ते चार वेळा नागरिकांना आवाहन करून सुरक्षित अंतर ठेवा असे सांगत आहेत. मात्र नागरिक याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे आरटीओनाही आता नागरिकांसमोर हात टेकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक अधिकारी याबाबत गांभीर्याने घेत असले तरी नागरिक मात्र कोरोना हे गांभीर्य पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी यापुढे तरी सुरक्षित अंतर ठेवून आपली कामे करून घ्यावीत असे आवाहन आरटीओ शिवानंद मगदूम यांनी केले आहे.
दरम्यान वेगवेगळ्या कार्यक्रमात असे प्रकार दिसून येत आहेत. सरकारी कार्यालयात तर विशेष करून नागरिकांची गर्दी वाढतच चालली आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे ही नागरिकांची जबाबदारी असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.