बेळगाव न्यु गांधीनगर येथील व्हॉलसेल फुल मार्केट आता अशोक नगर बुडा कार्यालया शेजारी स्थलांतरित झाले असून रविवारी फलोत्पादन खात्याच्या या नवीन फुल मार्केटचा शुभारंभ करण्यात आला.
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी फित कापून नूतन व्हॉलसेल फुल मार्केटचे उदघाटन करण्यात आले.अशोक नगर नवीन 10 गाळ्यांचे सुसज्ज असे व्हॉलसेल फुल मार्केट उभारण्यात आले आहे.या अगोदर न्यु गांधी नगर येथील फुल मार्केटमध्ये गर्दी होत होती रहदारीचे कोंडी होत होती याची दखल घेत नवीन फुल मार्केट उभारण्यात आले आहे.
बेळगावातील फुल व्यापाऱ्यांनी अनेक अडचणीना सामोरे जात फुलांचा व्यापार टिकवून ठेवला आहे त्यामुळे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत.महात्मा फुले रोड,नरगुंदकर भावे चौक,आणि न्यु गांधी नगर असे तीन ठिकाणाहून हे मार्केट आता अशोक नगरला आले आहे या ठिकाणी शासनाच्या वतीने सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.व्यापाऱ्यांनी पार्किंग आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार अनिल बेनके यांनी केलं.
बेळगावात आगामी काळात कार्गो विमान सेवा सुरू होणार असून व्यापारी शेतकऱ्यांनी याबाबत चिंतन करावं आणि महाराष्ट्राप्रमाणे ग्रीन हाऊस मधून उत्पादन केली जाणारी फुले विदेशात देखील निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही सांगितले.यावेळी ए सी पी एन व्ही भरमनी,फलोत्पादन खात्याचे अधिकारी, व्यापारी असोसिएशनचे अल्ताफ अत्तार आदी उपस्थित होते.
न्यु गांधी नगरचे व्होलसेल फुल मार्केट झाले बुडा ऑफिस(अशोकनगर) शेजारी झाले शिफ्ट-
https://www.facebook.com/375504746140458/posts/1254265491597708/