Tuesday, January 14, 2025

/

चेतातंतूदाह-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

मानव उत्क्रांत होत गेला, तसा मानवाच्या मेंदूचाही विकास होत गेला. मेंदूचा कपाळकडचा भाग जास्तीत जास्त प्रगल्भ होत गेला. त्यातूनच माणसाची बुद्धी, जाणीव, भावना व संवेदना या वृत्ती अधिकाधिक सक्षम होत गेल्या. चेतनासमूह ही इतकी उत्कृष्ट रचना आहे की, अभ्यासताना अक्षरक्ष: अवाक व्हायला होते. मानव शरीरातील वेगवेगळ्या भागातील अवयवांचे कार्य सहकार्याने करवून घेण्याचे काम चेतासंस्था करते. चेतनासंस्थेचे मेंदू चेतारज्जू आणि चेतातंतू जाळे पसरलेले असते. चेतासंस्थेकडून माहिती नेण्याचे आणि दूरवरच्या भागांची माहिती मध्यवर्ती संस्थेला पुरविण्याचे काम चेतातंतू करतात. एखाद्या चेतनवाहिनीला किंवा अशा अनेक वाहिन्यांना सूज आल्याने हा चेतातंतूदाह किंवा न्यरोपॅथीचा विकार होतो.

www.drsonalisarnobat.com
कारणे : चेतातंतूदाहाचे मुख्य कारण महणजे रक्तातील आणि शरीरातील इतर द्रवपदार्थात, पेशी द्रवात निर्माण झालेले विषारी घटक ,आरोग्याचे नियम न पाळणे, चुकीच्या खाण्याच्या पद्धती, अवाजवी अतिश्रम, शरीरातील पोषक द्रव्यांची कमतरतात. खोल जखम किंवा चेतासंस्थेवर प्रचंड ताण आल्याने, हाडांची जागा बदलल्याने, हाड मोडल्यामुळे चेतनादाह होतो. मधूमेह, पारा, अर्सेनिक, अल्कोहोल, शिसे असे विषारी घटक व विकार, किटकनाशकांचा दुष्परिणाम, विषाणू अशा अनेक विध कारणांमुळे चेतातंतूदाह होऊ शकतो. या संयुक्त विकाराला न्युरोपथी असे नाव आहे. मधुमेह या विकारात अशी लक्षणं जास्तीत जास्त आढळून येतात.

लक्षणे : या दाहाचे मुख्य लक्षण म्हणजे वेदना आणि आग होणे. शब्दश: हातापायाचा दाह होतो. तळहात, तळपाय गरम होतात. हातापायात बोचल्यासारख्या सटसटणार्‍या वेदना होतात. मुंग्या येतात. हातपाय, कंबर, मान, चेहरा याठिकाणी अशा वेदना जास्त होतात. बधिरता येते. संवेदना कमी होते. कालांतराने स्नायूंची कार्यक्षमता कमी होऊन स्नायू लुळे पडतात. स्नायूंची ताकद व लवचिकता कमी होते. त्वचा गरम राहतो.

आहार-उपचार : समतोल आहार घेतल्याने बरेचसे विकार आटोक्यात राहू शकतात. सेंद्रिय पद्धतीने कसलेल्या शेतीतल अन्नपदार्थ वापरल्याने किटकनाशकांचा प्रभाव जो आपल्या शरीरावर घातक पद्धतीने पडत आहे तो पूर्णत: आटोक्यात आणता येईल.

सोयाबीन : सोयाबीनचे दाणे 12 तास पाण्यात भिजत टाकावेत. नंतर त्याची साल काढून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. त्या वाटणात तिप्पट पाणी घालून सोयाबीनचे हे दूध मंद आचेवर उकळावे. ढवळत रहावे. थंड करुन सुती कापडातून गाळून घ्यावे. चवीपुरती साखर घालून एक चमचा मध घालून प्यावे. रोज रात्री जेवणानंतर अर्धा कप सोयाबीन दूध पिल्याने चेतातंतूदाह कमी होतो.

बार्ली : बार्लीची पेजसुद्धा गुणकारी आहे. दाण्यावरचे साल काढून बार्ली पाण्यात उकळावी. पेज बनल्यावर अर्धा पेला ताक व अर्ध्या लिंबाचा रस मिसळून प्यावी. व गटातील जीवनसत्वे बी 1, बी 2, बी 6, बी 12 आणि पॅटोथेनिक अ‍ॅसिड ही जीवनसत्वे घेतल्याने तात्कालिक आराम वाटतो.
होमिओपॅथी : आहार उपचार हे फक्त जोडउपचार असतात. त्यामुळे आजार पूर्ण बरा होऊ शकत नाही. संपूर्ण बरे होण्यासाठी होमिओपॅथिक उपचार आवश्यक आहेत. बोचल्यासारख्या वेदना, उष्णवेदना, दाह, ठसठसणार्‍या वेदना, बधिरता, मुंग्या येणे, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी फिरणार्‍या वेदना अशा अनेक वेदनांवर अनेक औषधे आहेत. वेदनांच्या प्रकारावर औषधं दाखवणारं हे एकमात्र शास्त्र आहे. न्युरोपथीवर इलाज करताना कारण,वेदनेचे ठिकाण, वेदना पसरण्याची जागा, वेळ, हवामानातील बदल, दैनंदिन बदल, स्त्री-पुरुष वय, आदींची दखल घ्यावी लागते.
9916106896
9964946918

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.