सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी तालुका भागामध्ये रस्ता रुंदीकरण आणि हेस्कॉमकडून वीजवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे तालुक्यातील काही भागामध्ये सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
मुचंडी, अष्टे, चंदगड, खणगांव खुर्द, खणगांव बुद्रुक, चंदूर, पदिन्नी, भीमगड, सिद्दनहळ्ळी, कबलापूर, सोमनट्टी, करीकट्टी, तुम्मरगुद्दी व कलखांब या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन हेस्कॉमच्यावतीने करण्यात आले आहे.