Tuesday, April 30, 2024

/

बेकायदेशीर मद्यविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी केली कारवाई

 belgaum

मारिहाळ पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या बाळेकुंद्री बुद्रुक येथील एस. के. गार्डन ढाबा याठिकाणी धाड घालून बेकायदेशीर मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

या कारवाईत बसनगौडा शंकरगौडा पाटील (रा. होन्नीहाळ) आणि गिरीश महारुद्राप्पा यादवाड या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रुपये १००२० रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

याचप्रमाणे विविध बनावटीच्या रुपये ९०८७ किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

 belgaum

या प्रकारांची नोंद मारिहाळ पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.