महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत जिल्हा पालकमंत्री रमेश जारकिहोळींनी नुकतेच एक विधान केले होते. त्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनीही या वृत्तबाबत नवे वक्तव्य केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अरविंद पाटील यांची भाजप प्रवेश करण्याची इच्छा असून त्यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचीही भेट घेतली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल मुख्यमंत्र्यांनीही सहमती दर्शविली आहे, अशी माहिती सवदी यांनी दिली.
बेळगावच्या राजकारणाचा कणा असलेल्या डीसीसी बँकेच्या 16 पैकी 3 जागांसाठी आज निवडणूक होत असून यात काँग्रेसच्या अंजलीताई निंबाळकर आणि अपक्ष म्हणून अरविंद पाटील हे निवडणूक लढवीत आहेत.
उर्वरित 13 जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लंढविणाऱ्या अरविंद पाटील यांना भाजपाने पाठिंबा दर्शविला आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना ते म्हणाले की, बिहार येथील निवडणूका पार पडल्यानंतर तसेच राज्यातील पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर तात्काळ मंत्रिमंडळ विकास करण्यात येणार आहे. परंतु मुख्यमंत्री बदल होणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.