कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले असून कोरोना रुग्णांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होण्यापासून रोखण्यासाठी यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध घातले आहेत.
यासंबंधीचा आदेश लवकरच मुख्यमंत्री जारी करतील अशी माहिती मिळाली आहे. कोरोना रुग्णाच्या तब्येतीवर फटाक्यांमुळे वाईट परिणाम होऊ शकतो अशी शक्यता आरोग्य विभागाच्या तज्ञ समितीने वर्तविली आहे.
राज्यसरकारच्या वतीने लवकरच यासंबंधीचा आदेश जारी करण्यात येणार असून कोरोना तज्ञ समिती आणि तांत्रिक सल्लागार समितीची बैठक आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी नुकतीच घेतली आहे. यादरम्यान फटाक्यांमुळे होणाऱ्या परिणामांविषयी चर्चा करण्यात आली. यासोबतच कोरोना संक्रमित रुग्णांवर फटाक्यांच्या धुरामुळे वाईट परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत फटाक्यांवर बंदी येण्याची चिन्हे दिसत आहेत.