बेळगाव पोलीस आयुक्तालय इमारत बांधकामाला लवकरच प्रारंभ होणार असून मंगळवारी या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम पार पडणार आहे.
सोमवारी गृहमंत्री बसवराज बोम्मई हे बेळगावमध्ये दाखल होणार असून मंगळवारी होणाऱ्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.
सोमवारी रात्री बोम्मई यांचा बेळगाव येथेच मुक्काम असून मंगळवारी सकाळी बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते होणार आहे.
शहरातील आरएलएस महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस लाईन परिसरात इमारत बांधण्यात येणार असून सरकारच्यावतीने नव्या इमारत बांधकामासाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
इमारत बांधकामासाठी आधीच अनुदान मंजूर करण्यात आले असून या इमारतीचे ठिकाण अद्याप निश्चित होत नव्हते. परंतु आता अनेक दिवसानंतर आरएलएस महाविद्यालयाच्या मागील परिसरात गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम होणार आहे.