दिपावली निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री दुर्गसेवा बेळगांवच्या धारकऱ्यांनी सायकलवरून गडकोट मोहीम करण्याच्या आपल्या उपक्रमाला काल शुक्रवारी रात्री रात्री ठिक 11 वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक (बोगारवेस) येथून प्रारंभ केला आहे.
हालगा, धामणे, मच्छे आणि वाघवडे या चार गावातील सचिन चोपडे, रोहित येळ्ळूरकर, महेश मोरे, कल्लापा जयनाचे, किशोर लाड, हरीश पाटील, बबितेश सुळगेकर, रवी मिसाळे, रोहन कनबरकर, नागराज लाड, अमोल बेळगुंदकर, अमित कणबरकर व प्रवीण पाटील हे सर्व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,श्री दुर्गसेवा बेळगावचे युवा धारकरी दिपावलीच्या निमित्ताने सायकलींवरुन गडकोट मोहीम करण्यासाठी काल शुक्रवारी रात्री रात्री 11 वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकातून रवाना झाले आहेत.
हे सर्व धारकरी येत्या सोमवार दि.16 नोव्हेंबर रोजी आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज श्री किल्ले रायगड येथे जाऊन 32 मण सुवर्ण सिंहासनाचा संकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शिवछत्रपतींच्या चरणी साकडं घालुन दिपोस्तव साजरा करणार आहेत. त्याचप्रमाणे या धारकऱ्यांकडून दुर्गसेवा देखील करण्यात येणार आहे.