Saturday, December 28, 2024

/

सैनिक स्मारकास कॅन्टोनमेंट बोर्डाचा हिरवा कंदील

 belgaum

गोगटे सर्कल येथील उद्यानाचा विकास करून त्या ठिकाणी सैनिक स्मारक निर्माण करण्यास आमची कोणतीच हरकत नसल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती बेळगांव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली.

बेळगांव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण बैठक आज पार पडली. या बैठकीस उपस्थित राहिलेल्या आमदार बेनके यांनी बैठकीनंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना उपरोक्त माहिती दिली. रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या गोगटे सर्कल येथील उद्यानाचे सैनिक स्मारकामध्ये रूपांतर करण्याची माझी फार दिवसा पासूनची इच्छा आहे. या स्मारकासाठी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक होते. यासंदर्भातील मुद्दा आजच्या सर्वसाधारण बैठकीच्या विषयपत्रिकेवर देखील होता.

Catonment board bgm
Catonment board bgm logo

दरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्वा यांनी नियोजित सैनिक स्मारकास आपली हरकत नसल्याचे सांगितले आहे. तुम्हाला स्वतःला जर त्या ठिकाणी सैनिक स्मारक उभारावयाचे असेल तर ते तुम्ही खुशाल उभे करा. त्यासाठी हवे तर उद्यापासून कामाला सुरुवात करा, असेही त्यांनी सांगितल्याचे आमदार बेनके यांनी स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील ओल्ड ग्रँड बंगल्यातील अनधिकृत बांधकामाच्या सर्वेक्षणाच्या मुद्द्यावरच बैठकीत झालेल्या चर्चेची आमदार बेनके यांनी थोडक्यात माहिती दिली. तसेच हे सर्वेक्षण फक्त अनधिकृत बांधकामासाठी असून बंगले हस्तांतरणासाठी नाही, असे स्वतः बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी बैठकीत स्पष्ट केले असल्याचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.