Sunday, November 24, 2024

/

पिस्तूल खरेदी विक्री प्रकरणी चार जणांना अटक

 belgaum

बेळगाव जिल्हा अमली पदार्थ तस्करीमध्ये अडकला आहे. दरम्यान तिने राज्यातील सीमेवर असलेल्या बेळगावात मोठ्या प्रमाणात अनेक गैरप्रकार होत आहेत. त्यामुळे नागरिकांना धास्ती कायम असली तरी गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस सज्ज आहेत.

नुकतीच सुरू केलेल्या गांजा मटका व तस्करी प्रकरणाला पोलिसांना यश आले असले तरी अनेक गैरप्रकार बेळगाव सीमाभागात घडत असल्याचे उघडकीस येत आहे. बेळगाव चोरला मार्गावर पिस्तूल खरेदी व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळताच खानापुर पोलिसांनी चार जणांना अटक केल्याचे उघडकीस आले आहे.

उचवडे फाट्यावर येथे पिस्तुल खरेदी-विक्री सुरू असल्याचा कट शिजत होता. दरम्यानच्या काळात पोलिसांनी या गटाला उधळत चौघांना जणांना अटक केली आहे. खानापूर ते गोवा मार्गावर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तस्करीचा विळखा वाढत असताना आता अवैद्य तस्करीसाठी हि हा मार्ग प्रसिद्ध होऊ लागला आहे.

एका परप्रांतीय इसमाकडून पिस्तूलची विक्री करण्यासाठी काहीजण जमले होते. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे. संबंधितांकडून जिवंत काडतुसे ही जप्त करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार घातपात घडवून आणण्यासाठी पिस्तुलाची खरेदी-विक्री करण्यात येत होती अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

त्यामुळे आता बेळगाव चोरला मार्ग आणखी एका अवैध धंद्या प्रकरणी चर्चेत आला आहे. दरम्यान उचवडे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक गैरप्रकार वारंवार घडत असल्याचेही सांगण्यात येत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील गैरप्रकार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.