Wednesday, January 1, 2025

/

खानापूर येथे बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या चौकडीला अटक

 belgaum

खानापूर येथे दुपारी २ च्या सुमारास गस्त घालण्यासाठी गेलेल्या सुरेश शिंगी या पोलीस निरीक्षकांना संशयास्पदरित्या काही लोक वावरताना आढळले. दरम्यान यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे बेकायदेशीररीत्या पिस्तूल असल्याचे आढळून आले असून या चौकडीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खानापूर पोलीस स्थानक हद्दीतील उचवडे क्रॉसनजीक हा प्रकार उघडकीस आला असून या चौघांकडून पिस्तुलासहित अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. हा प्रकार लक्षात येताच शिंगी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली. पोलीस अधीक्षक आयपीएस लक्ष्मण निंबरगी, वरिष्ठ पोलीस अधिकारी अमरनाथ रेड्डी तसेच बैलहोंगल उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक प्रदीप गुंती यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात तुलसीदास लक्ष्मण जोशी, (वय ३२, रा. कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र), सतीश उर्फ सचिन सिद्दप्पा डवळी (वय २७, रा. कलमेश्वर गल्ली, गुरुदेव गल्ली, वडगाव, जि. बेळगाव), उमेश निंगाप्पा बिलीयळी (वय ३५, रा. बंगारेप्पा बडावणी, घ. न. ३०६, तिसरा क्रॉस, अन्नीगेरी, धारवाड) आणि गुरवय्या शेखरय्या लगमय्यनवर (वय ३१, रा. अंतुर, बेंतुर, ता. जि. गदग) या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक सेमी ऑटो पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे, मोबाईल संच, ३४ हजार रोख रुपये, टाटा इंडिका कार, २ मोटार सायकल असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. खानापूर पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून सुरेश शिंगी, बसगौड पाटील, बसगौड नेर्ली, एन. के. पाटील, एस. एस. तुरमुंदी, एन. ए. चंदरगी, आय. एम. नन्नेखान, एस. एच. हादीमनी, मेहबूब दादामलिक, के. जि. किल्लेदार, एस. एस. हुंबी, ए. एम. चिक्केरी, डी. एस. चिक्कमठ, सिद्राम तल्लुर, एस. सी. पुजारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.