कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस एडीयुरप्पा यांनी कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्यातील मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक मदतीसाठी मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
त्या प्राधिकरणाला 50 कोटी रुपये अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. कर्नाटक राज्यात मराठा समाज असला तरी त्याची संख्या बेळगाव जिल्ह्यात अधिक आहे.यामुळे दिवंगत भाजप नेते आणि खासदार सुरेश अंगडी यांच्यासह अनेक नेत्यांनी यासाठी प्रयत्न केले होते.
याची दखल घेऊन कर्नाटक सरकारने प्राधिकरणाची स्थापना केली असून त्या माध्यमातून विकास साधला जाणार आहे.एक मराठा लाख मराठा च्या माध्यमातूनही कर्नाटकात झालेल्या मोर्चांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया मराठा समाजात आहे.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणा करिता एक मराठा लाख मराठा अनेक मोर्चे काढण्यात आले होते त्याच धर्तीवर कर्नाटकातील मराठा समाजाने देखील अनेक मोर्चे काढले होते या मोर्चातून मराठा समाजाच्या विकास करण्याची मागणी करण्यात आली होती मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी मराठा विकास प्राधिकरणची स्थापना करत 50 कोटींचे अनुदान दिले आहे
मराठा विकास प्राधिकरणची स्थापना करून 50 कोटी रुपये मंजूर केल्या बद्दल उत्तर आमदार अनिल बेनके आणि भाजप ओबीसी नेते किरण जाधव या यांनी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांचं आभार व्यक्त केले आहे.मराठा समाजाची जुनी मागणी पूर्ण झाली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.