सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजेच फेसबुक फ्रेंड्स सर्कल. या संघटनेच्यावतीने दिवाळीनिमित्ताने विविध ठिकाणी स्तुत्य उपक्रम करण्यात आले.
खानापूर तालुक्यातील हासनवाडी या आदिवासी गावात तसेच रेल्वे स्थानकावरील गरजू महिलांना आणि शहरातील इतर ठिकाणच्या गरजूंना कपडे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.
खानापूर तालुक्यातील हासनवाडी येथील आदिवासी गावात २६ महिलांना साड्या आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे बेळगावच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानकासमोरील मस्जिद, शनी मंदिर, फोर्ट रॉड येथील मशीद, किल्ला तलाव याठिकाणी रात्रीच्या वेळी निवारा घेणाऱ्या गरजू महिलांनाही साड्या आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थांचेही वाटप करण्यात आले.
या उपक्रमात फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे मुख्य संतोष दरेकर, त्याचप्रमाणे शबोद्दीन बॉम्बेवाले, मास्टर अगत्य उर्जित स्वामी, रमेश धोंडगी, समीर शेख, आनंद तोटगी, देवदत्त देसाई, माधव प्रभू, खादिम बेपारी, अमित परमेकर आदींनी सहभाग घेतला होता.
फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने नेहमीच असे उपक्रम हाती घेण्यात येतात. शहर परिसरात अनेक गरजू लोक आहेत. अशा गरजू लोकांच्या मदतीसाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात येतो. मानवतेचा संदेश सर्वत्र पसरवून समाजात समानता आणण्यासाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कल कार्य करीत आहे.