मुख्यमंत्री पदावरून बी. एस. येडियुरप्पा हे लवकरच पायउतार होतील, याची आपल्याला खात्री आहे, त्यांची मुख्यमंत्रीपदी करण्यात आलेली निवड ही घाईगडबडीत केली असल्याने आता लवकरच मुख्यमंत्रीपदावरून ते पायउतार होतील, अशी टिप्पणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली आहे.
बंगळूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले असून विद्यमान सरकार हे आर्थिक अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्रीपदावरून बी. एस. येडुयुरप्पा यांना हटवण्यासाठी कसरत सुरु आहे.
परंतु येडियुराप्पांना मुख्यमंत्रीपदावरून हटविणे मोठे कष्टदायी आहे. सरकार स्थापनेवेळी घाईगडबडीत मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड करण्यात आली असून राज्यातील आर्थिक अडचणी वाढल्या असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.