दिवाळी सण म्हटलं कि सजावटीला अधिक प्राधान्य दिले जाते. घरगुती लक्ष्मी पूजन तसेच व्यवसायाच्या ठिकाणी धुमधडाक्यात लक्ष्मी पूजन केले जाते. या लक्ष्मी पूजनासाठी महत्वाचा घटक म्हणजेच फुले. सध्या होलसेल फुल बाजारात विविध नमुन्याची रंगीबेरंगी फुले दाखल झाली असून अशोक नगर येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या होलसेल फुल बाजारात आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
कोरोना महामारीमुळे यंदा सध्या पद्धतीने सर्व सण साजरे होत आहेत. परंतु तरीही नागरिकांमध्ये उत्साहाची कमी नाही. यंदाच्या परतीच्या पावसामुळे फुलांच्या उत्पादनात घट झाली असून फुलांचे दर वधारले आहेत.
बेळगावमधील होलसेल फुल बाजारात शेवंती, झेंडू, अष्टार, गलाटा, गुलाब अशा विविध फुलांची आवक झाली असून सकाळी आज या फुलांच्या बाजारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
या होलसेल फुल बाजारातून गोवा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, तेलंगणा, कोकण, गोकाक, खानापूर, बैलहोंगल, कित्तूर अशा अनेक ठिकाणी तसेच स्थानिक बाजारपेठेत या फुलांची मागणी आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या फुलांच्या दरापैकी शेवंती ३०० रुपये, झेंडू १५० ते २०० रुपये, गुलाब ३०० ते ३५० रुपये प्रतिकिलो असे दर आहेत. यरगट्टी, लोकापूर, गदग तसेच आंध्र प्रदेश, बंगळूर, नाशिक, विदर्भ अशा विविध ठिकाणांहून आवक करण्यात आलेल्या या फुलांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यंदा फुलांची आवक खूप कमी प्रमाणात असल्याचे होलसेल फुलांचे व्यापारी अल्ताफ अत्तार यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना सांगितले.
आज ठिकठिकाणी लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम पार पडतो. या पूजनासाठी फुलांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सकाळी सकाळीच होलसेल फुलांच्या बाजारात खूप मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोनाचे संकट थोड्या फार प्रमाणात घातल्याची चिन्हे दिसत असल्यामुळे बाजारपेठेत गर्दीचे प्रमाण अधिक दिसून आले.
रंगीबेरंगी फुलांनी सजलाय बेळगावचा फुलांचे होलसेल मार्केट-दिवाळी निमित्त फुलं खरेदीसाठी गर्दी-शेवंती, अष्टर,गुलाब,गलाटा आदी विविध नमुन्यांची फुले बाजारात दाखल
https://www.facebook.com/375504746140458/posts/1259556627735261/