कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात आर्थिक परिस्थिती कोलमडली असताना भारत देशाचे मात्र आर्थिक परिस्थिती बळकट होत असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. बेळगाव जिल्ह्यातील आरटीओ विभागात कोरोना काळात 15 कोटींचा फटका बसला आहे.
ही परिस्थिती सुधारण्यासाठी आरटीओ कार्यालयाची लक्ष आता दिवाळी बंपरकडे लागून राहिले आहे. जर दिवाळीमध्ये अधिक प्रमाणात वाहने खरेदी झाली तर महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून आरटीओ कार्यालयाचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे.
त्यामुळे सारेच अधिकारी आता कामाला लागले आहेत. दरम्यान वाहने खरेदीसाठी दिवाळी पाडव्याला शुभ मुहूर्त मानला जातो. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर ही वाहनांची खरेदी झाली आहे. मात्र अजूनही आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आणि महसुलात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आरटीओ कार्यालय प्रयत्नात आहे.
सध्या दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी होते. त्याची नोंदणी करण्यासाठी आरटीओ विभागाला माहिती देण्यात येते. त्यामुळे महसुलातही वाढ होऊन पूर्वीइतकाच महसूल सरकारला जमा करण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आले असले तरी दिवाळीच्या बंपर प्राईज वर ग्राहक खरेदी केल्यानंतरच आर्थिक घडी बसणार असल्याचेही समजते. कोरोना काळात तब्बल पंधरा कोटींचा फटका आरटीओ विभागाला बसला आहे.
ही परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आरटीओ कार्यालयातील अधिकारीही धडपडू लागले आहेत. दरम्यान दिवाळीच्या बंपर प्राईज वर वाहन खरेदी जोमात झाल्यास ही तफावत भरून येणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.