कोरोनाच्या नावाखाली ७५ लाख रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला असून एसीबींकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हि तक्रार सामाजिक कार्यकर्ते गंगाधर दोडमनी यांनी केली असून यासंदर्भात खोटी कागदपत्रे आणि बिले अदा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
खानापूर तालुक्यात मार्च ते मी महिन्यापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. परंतु या प्रकरणी पेंडाल व्यवस्थेसाठी १७,८९,१८० रूपये, ब्यारीकेड्स सही १,४१,६०० रुपये तसेच जेवण, सॅनिटायझर, मास्क आणि इतर कामासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे.
इतका खर्च करून कोणतेही काम करण्यात आले नाही. शिवाय या कामासाठी टेंडर देखील पस करण्यात आले नसून खानापूर तहसीलदारांनी अफरातफर केल्याचा आरोप गंगाधर दोडमानी यांनी केला आहे.
हे साहित्य हुक्केरी तालुक्यातून खरेदी करण्यात आले असून त्यांना हि माहिती आरटीआय अंतर्गत मिळाली आहे. हि तक्रार एसीबींनी दाखल करून घेतली असून यासंर्दभात पुढील तपास करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.