Thursday, January 30, 2025

/

कोरोना रुग्णांसाठी “सिव्हिल” मध्ये आता 260 बेड्स राखीव

 belgaum

बेळगांव जिल्ह्यातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 400 पेक्षा कमी झाली असून बुधवारी हा आकडा 394 इतका होता. त्यामुळे बेळगांव सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांसाठी असणाऱ्या बेड्सची संख्या आता 740 वरून 260 इतकी कमी करण्यात आली आहे.

बेळगांव सिव्हिल हॉस्पिटलचे पूर्णपणे कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले होते. परंतु कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे सोमवारपासून या हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागासह (ओपीडी) अन्य सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठीच कोरोना रूग्णांसाठी आता फक्त 260 बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. तथापि सध्या या 260 बेड्सपैकी 49 भरलेले असून उर्वरित 211 बेड्स रिकामे पडून आहेत. या 260 बेड्स पैकी 230 ऑक्सिजन बेड्स असून दहा आयसीयू बेड्स आहेत.

मध्यंतरी एक वेळ अशी होती की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड्स मिळणे कठीण होते. परंतु आता कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाल्यामुळे आरोग्य खाते आणि कोरोना वॉरियर्सवरील कामाचा ताण हलका झाला आहे. दरम्यान कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. तेंव्हा नागरिकांनी कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करावे. सामाजिक अंतराचे भान ठेवून मास्क वापरावा, असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.