काल नेहरू नगर येथील १६ वर्षीय बसवराज रामाप्पा सुतगट्टी या बालकामगाराचा मृत्यू झाला होता. याठिकाणी बांधकाम करताना कंपाउंड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या या मुलाचा शवविच्छेदन अहवाल आला असून, बिल्डर तसेच मेस्त्री यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे प्रकरण इथेच थांबले नसून कारवाईच्या भीतीपोटी बिल्डर कडून मृत मुलाच्या कुटुंबियांना पैसे देऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न कण्यात येत आहे. परंतु नियमांचे उल्लंघन केल्यामुळे संबंधित बांधकाम कंत्राटदाराला आता नागरिक जाब विचारात आहेत.
सोनट्टी येथे जन्मलेल्या बसवराज सूतगट्टीचा शवविच्छेदन अहवाल महसूल, पोलीस आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी जाहीर करण्यात आला असून बेळगावचे एसी अशोक तेली, मार्केट एसीपी कट्टीमनी, पीआय जावेद मुशापुरे, काकती पीआय राघवेंद्र हल्लूर, पीएसआय अविनाश यरगोप, महसूल निरीक्षक सतीश बीचगट्टी, यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.
या बालकाच्या मृत्यूला बांधकाम मालकाचे दुर्लक्ष कारणीभूत असून नियमानुसार बांधकामाच्या शेजारी ३ फूट जागा ठेवणे आवश्यक्य होते. परंतु हि जागा ठेवण्यात न आल्याने जवळच असलेल्या कम्पाउंडची भिंत कोसळून हि दुर्घटना झाली. आणि या दुर्घटनेत या बालकाचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाचा अहवाल येण्याआधीच अंत्यसंस्कार उरकण्यात आल्यायामुळे याबाबतीतही नियम मोडल्याची बाब निदर्शनास आली आहे.