Monday, January 27, 2025

/

दिवाळी साजरी करा ‘बेळगाव लाईव्ह’ सोबत..

 belgaum

आमच्या तमाम वाचकांना ‘टीम बेळगाव लाईव्ह’ कडून दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
॥ तमसो मा ज्योतिर्गमय ॥ या पंक्तींप्रमाणे आपल्या साऱ्यांच्या आयुष्यातील अंधाररूपी संकटे दूर सारून आपल्या आयुष्यात प्रकाशाची दिवाळी साजरी होवो. गेली चार वर्षे सातत्याने बेळगावसह परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणाऱ्या ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून नेहमीच वाचकांसाठी नवनवे उपक्रम हाती घेण्यात येतात.

यंदाच्या दिवाळीत आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही ‘बेळगाव लाईव्ह दिवाळी स्पेशल’ उपक्रम घेऊन आलो आहोत. या उपक्रमात आपण साजरी करत असणाऱ्या दिवाळी सणाची छायाचित्रे आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत.

Deewali
Deewali deep

मग ते छायाचित्र आकाशकंदिलाचे असो किंवा आपल्या माध्यमातून प्रकाशमान होणाऱ्या दिवाळीचे.. आपले कौटुंबिक दिवाळी सणाचे छायाचित्र, भाऊबीज, बलिप्रतिपदा, आपल्या परिसरात विविध पद्धतीने साजरी होणारी दिवाळी इतकेच नव्हे तर बालचमूंनी साकारलेले किल्ले या सर्वांची छायाचित्रे आमच्या 9663773011 व 9448351816 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवून द्यायची आहेत.

 belgaum

आपल्या छायाचित्रांना जगभर प्रसिद्धी देण्याचे काम ‘बेळगाव लाईव्ह’च्या माध्यमातून केले जाईल. पुन्हा एकदा आपल्या साऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.