भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे पुढील आठवड्यात बेळगांवला भेट देणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून समजते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे पुढील आठवड्यात दक्षिणेतील राज्यांच्या प्रवास दौऱ्यावर निघणार आहेत. त्या अनुषंगाने ते बेळगांवला भेट देणार असून स्थानिक भाजप नेत्यांची बैठकही घेणार असल्याचे कळते मात्र हा दौऱ्याची अध्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार संदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी काल बुधवारी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली आहे.
तथापि या भेटीप्रसंगी तुर्तास कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्तार अथवा पुनर्रचनेला नड्डा यांनी परवानगी नाकारल्याचे समजते.
राज्यातील भाजप नेतृत्व बदलासंदर्भात चर्चेला प्रारंभ झाले असताना भाजप राष्ट्रीयअध्यक्षांच्या बेळगाव भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच बेळगाव लोकसभा पोट निवडणूकित उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत देखील या बेळगाव दौऱ्यात चर्चा होऊ शकते.