कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत चालली असून संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी 32 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या कोविड रुग्णांची संख्या ४०० च्या घरात असून बुधवारच्या कोविड आकडेवारीनुसार सध्या ३९४ कोविड रुग्ण उपचार घेत आहेत.
आजपर्यंत एकूण २५३१५ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले असून ३४० जणांनी कोविडमुळे आपला जीव गमावला आहे. अजूनही कोविड रुग्णांच्या चाचण्या घेण्यात येत असून १८८५ रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे.
आज ३४ जणांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत २५५७७७ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
आज नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी बेळगावमधून १५, गोकाक मधून ८, बैलहोंगलमधून २, हुक्केरी मधून २, सौन्दत्ती मधून १, रामदुर्गमधून ३ तर रायबाग मधून एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.