शहरातील अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘बेळगाव लाईव्ह’ च्या बातमीचा इम्पॅक्ट अनेकवेळा दिसून आला आहे. काल रात्री हिंदवाडी येथील रानडे कॉलनीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची दखल घेऊन बेळगाव महानगरपालिका प्रशासनाने या भागाची स्वच्छता केली आहे.
शहरात अनेक ठिकाणी होणाऱ्या घटनांचा आढावा तात्काळ ‘बेळगाव लाईव्ह ‘वर प्रकाशित करण्यात येतो. आणि वेळोवेळी याची दखलही घेतली जाते.
संपूर्ण शहराचा लेखाजोखा तात्काळ एका क्लिकवर उपलब्ध करून देणाऱ्या ;बेळगाव लाईव्ह’ च्या बातमीचा इम्पॅक्ट दिसून आला असून हिंदवाडी येथील रानडे कॉलनी परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. यामुळे येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
हिंदवाडी येथील रानडे कॉलनीमध्ये अशाच पद्धतीचा प्रकार घडून येताना दिसत आहे. रानडे कॉलनी नजीक असलेल्या हॉटेल्स आणि कँटीनचा कचरा रस्त्यावर बिनधास्तपणे फेकून देण्यात आल्यामुळे हा परिसर कचऱ्याने व्यापून गेला होता. यासंबंधी प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. रानडे कॉलनीमध्ये टाकण्यात आलेला हा कचरा हळूहळू रस्त्यावर संपूर्णपणे पसरत चालला होता. यामुळे डासांचा प्रादुर्भाव तसेच अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांची शक्यता बळावत होती.
याठिकाणी टाकण्यात आलेल्या कचऱ्याची उचल त्वरित करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भातील बातमी ‘बेळगाव लाईव्ह’ने प्रकाशित केली होती. प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन, येथील कचऱ्याची उचल करून हा परिसर स्वच्छ केला आहे.