“बेळगांव लाईव्ह” न्यूज वेब पोर्टलने फेसबुकवर काल बुधवारी 1 लाख फॉलोवर्सचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रातील पत्रकार आणि संपादकांनी देखील बेळगाव लाईव्हचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
*मंदार फणसे*
1 लाख दर्शकांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल मी मनापासुन “बेळगाव लाईव्ह” न्यूज पोर्टलला शुभेच्छा देत आहे. या न्यूज पोर्टलने अल्पावधीत फक्त 1 लाख दर्शकांचा टप्पाच पूर्ण केला नाहीतर सर्वांच्या अपेक्षा देखील खूप वाढविल्या आहेत. हे न्यूज पोर्टल येणाऱ्या काळामध्ये अधिक नांवारूपाला येईल याची मला खात्री आहे, असा विश्वास मुंबईच्या “मिरर नाऊ” या राष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनीचे वरिष्ठ संपादक मंदार फणसे यांनी व्यक्त केला आहे. सीमाभागातील अन्यायग्रस्त मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणून बेळगांव लाईव्ह येणाऱ्या काळामध्ये अधिक नावारूपाला येईल याची मला खात्री आहे. बेळगांव लाईव्हकडून खूप अपेक्षा आहेत. कारण सीमावर्ती भागातील नागरिकांचे प्रश्न मांडणे हा एक प्रकारे पत्रकारितेचा वसा आहे. प्रकाश बेळगोजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे जे व्रत घेतली आहे ते माझ्या मते सर्वात महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा! असे मंदार फणसे शेवटी म्हणाले.
*संजय आवटे*
बेळगांव लाईव्ह हा बेळगांवचा चेहरा आहे, असे गौरवोद्गार काढून महाराष्ट्रातील साहित्यिक व विचारवंत आणि दैनिक दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे यांनी बेळगाव लाईव्ह ला शुभेच्छा दिल्या. बेळगांव हे माझं दुसरं घर आहे दुसरं गाव आहे. मी नियमित बेळगाःवला येत असतो. माझे खूप सन्मित्र बेळगांवला आहेत. मी बेळगांवात नसतो तेंव्हा बेळगाव लाईव्हवर असतो. कारण बेळगावच्या सांस्कृतिक साहित्यिक राजकीय आदी सर्व क्षेत्रात काय घडत आहे? काय घडणार आहे? हे बेळगांव लाईव्हवर दिसतं. शोषित आणि आणि पीडितांना आवाज देण्याचे काम बेळगांव लाईव्ह करत आहे. प्रसार माध्यमं बदनाम होत असताना बेळगाव लाईव्ह एक चांगली पत्रकारीता करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा! असे संजय आवटे म्हणाले.
*तुळशीदास भोईटे*
टीव्ही नाईन मराठी, मी मराठी सारख्या विविध वृत्तवाहिनीचे संपादक भूमिका पार पाडलेले आणि सध्या मुक्त विद्यापीठ या मराठी न्यूज पोर्टलचे संस्थापक संपादक तुळशीदास भोईटे यांनीदेखील बेळगांव लाईव्हला शुभेच्छा दिल्या आहेत. बेळगांव लाइव्ह ही एक भन्नाट वेबसाईट असून 1 लाख फॉलोवर्सचा टप्पा पूर्ण करणाऱ्या संपादक प्रकाश बेळगोजी यांच्या नेतृत्वाखालील या वेबसाईटने जो प्रवास सुरू केला आहे तो निश्चितपणे असाच वेगाने पुढे जाईल. एक विश्वसनीय आणि आपल्या हक्काचे वेबसाईट म्हणून फक्त बेळगांवाच नाही तर संपूर्ण सीमाभाग बेळगांव लाईव्हला आपलं म्हणेल. स्थानिक लोक तर बेळगांव लाईव्हला पाठिंबा देतातच परंतु देश-विदेशातील मराठी माणूस बेळगांवची माहिती करून घेण्यासाठी आवर्जून बेळगांव लाईव्ह वेबसाईटला भेट देत असतो, असे तुळशीदास भोईटे यांनी सांगितले.
*सचिन परब*
बेळगांव लाईव्ह सारखी मराठी वेबसाईट तीदेखील बेळगांवमध्ये राहून फेसबुकवर इतके फॉलोवर्स गोळा करते की फार मोठी गोष्ट आहे. त्याहीपेक्षा फेसबुकवर एक पैसाही खर्च न करता प्रकाश बेळगोजी यांच्या बेळगाव लाईव्हने 1 लाख कॉलरचा टप्पा पूर्ण केला हे त्याहून मोठे यश आहे, असे प्रशंसोद्गार महाराष्ट्र टाईम्स वेब आवृत्ती व नवा काळचे माजी संपादक, सध्या कोलाज डॉट इन व प्रबोधनकार डॉट कॉमचे संपादक सचिन परब यांनी काढले. गेली चार वर्षे “बेळगांव म्हणजे प्रकाश बेळगोजी आणि प्रकाश बेळगोजी म्हणजे बेळगाव लाईव्ह” असे एक समीकरण आमच्या महाराष्ट्रभरातील पत्रकारांच्या डोक्यात फिक्स झाले आहे. याचे कारण बेळगांव लाईव्ह ही वेबसाईट आहे. जलद वृत्तसंकलन आणि प्रसिद्धीमुळे 1 लाख फॉलोवर्स प्रकाश बेळगोजी यांच्या बेळगाव लाईव्हने मिळवले आहेत ही फार अभिमानाची गोष्ट आहे. बेळगाव लाईव्हला माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी बेळगांवचा झेंडा असा फडकवत ठेवावा ही सदिच्छा! असे सचिन परब शेवटी म्हणाले.
*विनोद राऊत*
अल्पावधीत बेळगांव लाईव्ह हे बेळगांववासियांचे ऑनलाईन मुखपत्र ठरले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे नमूद करून आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक व सकाळचे मुंबई रोजी विनोद राऊत यांनी 1 लाख फॉलॉवरचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल बेळगाव लाईव्ह शुभेच्छा दिल्या. माझे मित्र प्रकाश बेळगोजी यांनी आयबीएन लोकमत, जय महाराष्ट्र आणि मी मराठी या न्युज चॅनलच्या माध्यमातून बेळगावचा प्रश्न बुलंद ठेवला आहे त्यांनी सुरू केलेले बेळगांव लाईव्ह हे वेब पोर्टल बेळगांवच्या मराठी बांधवांना वाहिले पहिले वेब पोर्टल आहे. या माध्यमातून कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायासह बेळगांवचे सर्व प्रश्न त्यांनी मांडले आहेत. 1 लाख प्रेक्षकांचा टप्पा घातल्याबद्दल प्रकाश बेळगोजी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. यापुढे देखील सीमाप्रश्नाची धगधग त्यांनी कायम ठेवावी. तसेच सीमा बांधवांचा लढा याच पद्धतीने पुढे सुरू ठेवावा ही सदिच्छा, असे विनोद राऊत म्हणाले.