गेल्या महिन्यात एनआयएकडून अटक करण्यात आलेल्या झारखंड येथील सामाजिक कार्यकर्ते फादर सॅटर्न स्वामी यांची त्वरित मुक्तता करावी, या मागणीसाठी उद्या मंगळवार दि. 17 नोव्हेंबर रोजी बेळगांव ख्रिश्चन समाजाच्यावतीने मुक आंदोलन छेडले जाणार आहे.
झारखंड येथील सामाजिक कार्यकर्ते फादर सॅटर्न स्वामी यांना एनआयएकडून गेल्या महिन्यात अटक करण्यात आली आहे. फादर स्वामी यांनी झारखंड व आजूबाजूच्या राज्यांमधील कोळसा खाण कामगारांसाठी आंदोलन छेडले होते. परंतु त्यांना एनआयएकडून ताब्यात घेण्यात आले आहे. आता त्यांच्या सुटकेसाठी बेळगांवातील ख्रिश्चन समाजाने उद्या दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.