दोघा अज्ञातांनी एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गाडे मार्ग, खासबाग परिसरात बुधवारी रात्री घडली असून यामुळे या भागात खळबळ उडाली आहे.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नांव शेखर ज्ञानेश्वर शहापूरकर (वय 25, रा. गणेशपूर गल्ली, शहापूर) असे आहे. अज्ञाताच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेखर याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
त्याच्या डोक्याला इजा झाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
कोणत्या कारणासाठी हा हल्ला झाला आणि हल्लेखोराने कोणते हत्यार वापरले? याबाबतचा उलगडा अद्याप झालेला नाही. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरारी झाले. शहापूर पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.