विकासाला प्राधान्य देऊन भकास आला सुरुवात करण्याचे प्रकार वारंवार दिसून येतात. सध्या अनेक ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाने विकासाची कास धरत मोठमोठ्या कंपन्या बेळगाव शहर आणि परिसरात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे आज माणसाला मोबाईल हा गरजेची वस्तू वाटू लागला आहे.
मोबाईलमुळे दूरची माणसे जवळ आली आहेत. मात्र त्यासाठी लागणारी रेंज देणाऱ्या कंपन्या ग्राहकांची लुबाडणूक करताना दिसून येत आहेत. बेळगाव तालुक्यात असेच एक गाव आहे तिथे कोणत्याही कंपनीची रेंज पकडत नाही. त्यामुळे तेथील नागरिकांच्या व्यथा सांगाव्या तरी कुणाला असा प्रश्न या गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
वारंवार तक्रारी करायच्या कुणाकडे असे म्हणत निमुटपणे सिम कार्ड कंपन्यांच्या नावाने मूठमाती देण्यात आली आहे. बीएसएनएल एअरटेल वडाफोन किंवा आयडीया असो त्या गावात कोणतीच रेंज पकडत नाही आणि त्या गावचे नाव आहे अलतगा. त्यामुळे येथील नागरिकांनीही मोबाइल बंद ठेवण्याची धन्यता मानली आहे.
गाव तसे छोटे पण दिमाखात आणि तालुक्यात एक महत्त्वाचे स्थान ही असणारे गाव. मात्र या गावातील नागरिकांनी रेंजसाठी तक्रारी केल्या त्याचा काही फायदा झाला नाही. रेंज नसल्याने या गावातील नागरिकच म्हणतात तालुक्यातील रेंज नसलेले गाव म्हणजे अलतगा. त्यामुळे संबंधित मोबाईल कंपन्यांनी या ठिकाणी यावे आणि आपला प्रसार करण्यासाठी टॉवरची उभारणी करावी अशी मागणी होत आहे. विशेष बीएसएनएला प्राधान्य आहे. काही प्रमाणात या ठिकाणी बीएसएनएल रेंज येते.
मात्र सेवा सुरळीत नसल्याने येथील नागरिकांना अधिक तर आपला मोबाईल बंद ठेवावा लागतो. त्यामुळे याकडे बीएसएनएल गांभीर्याने लक्ष देऊन सेवा सुरळीत करावी अशी मागणी होत आहे. याचबरोबर इतर कंपन्यांनी ही या गावाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.