बेळगांव शहर झपाट्याने विस्तारण्याच्या प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागातील जमिनी घेऊन अनेक उपनगरे तयार झाली. परिणामी ग्रामीण भागातील जमिनींच्या दरांनी उच्चांक गाठल्यामुळे मुद्रांक आणि नोंदणी खात्याला याची दखल घ्यावी लागली आणि शेत जमिनीच्या दरामध्ये वाढ झाली. शहराच्या दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये सध्या वडगांव शिवाराला सर्वात जास्त बाजारमुल्य असून त्याखालोखाल अनगोळ ग्रामीण शिवार आणि शहापूर शिवाराचा क्रमांक लागतो.
सध्या शहराच्या दक्षिण भागात असलेल्या वडगांव येथील बागायत जमिनीला 37 लाख 15 हजार रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 28 लाख 53 हजार रु. आणि माळरान जमिनीला 22 लाख रु. प्रतिएकर बाजारमुल्य (दर) निश्चित करण्यात आला आहे. अनगोळ ग्रामीण भागातील बागायत जमिनीला 3 लाख रु. पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 19 लाख 86 हजार रु आणि माळरान जमिनीला 15 लाख रु. प्रतीएकर दर आहे. हॉस्पिटल्स व औद्योगिक वसाहती वाढत असल्यामुळे येथील दर वाढत आहे. वडगांव व अनगोळनंतर शहापूर शिवाराचा क्रमांक लागतो या ठिकाणच्या बागायत जमिनीला 27 लाख 80 हजार रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 21 लाख 52 हजार रु. तर माळरान जमिनीला 16 लाख रु. इतका प्रति एकर दर आहे.
मजगांव येथील जमिनीचे दर देखील भडकले असून या ठिकाणच्या बागायत जमिनीला 28 लाख रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 21 लाख 40 हजार रु. आणि माळरान जमिनीचा दर 16 लाख रु. प्रति एकर निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पिरनवाडी परिसरातील बागायत जमिनीला 22 लाख रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 16 लाख 10 हजार रु. आणि माळरान जमिनीला 15 लाख 50 हजार रु. प्रति एकर, मच्छे येथील बागायती जमिनीला 21 लाख 33 हजार रु. पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 15 लाख 45 हजार रु. तर माळरान जमिनीला 11 लाख रु. प्रतिएकर दर आहे.
दक्षिण भागातील जांबोटी रस्त्यावरील संतीबस्तवाड येथील बागायत जमिनीला 12 लाख 50 हजार रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 10 लाख 20 हजार रु. तर माळरान जमिनीला 8 लाख रु. प्रती एकर दर आहे. धामणे येथील बागायत जमिनीला 12 लाख 35 हजार रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 8 लाख 40 हजार रुपये तर माळरान जमिनीला 7 लाख 30 हजार रु., झाडशहापूर येथील बागायत जमिनीला 10 लाख 36 हजार रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 7 लाख 12 हजार रु. आणि माळरान जमिनीला 5 लाख 10 हजार रु. येळ्ळूर येथील बागायत जमिनीला 8 लाख 7 हजार रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 6 लाख 70 हजार रु. व माळरान जमिनीला 5 लाख 90 हजार रु., देसुर येथील बागायत जमिनीला 8 लाख 5 हजार रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 4 लाख 85 हजार रु., माळरान जमिनीला 3 लाख 80 हजार रु., किणये -कर्ले येथील बागायत जमिनीला 5 लाख 72 हजार रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 5 लाख रुपये तर माळरान जमिनीला 3 लाख 90 हजार रु. प्रतिएकर दर निश्चित करण्यात आले आहेत.
शहराच्या पश्चिम भागात उचगांव येथील जमिनीला सर्वात जास्त दर आहे. उचगांव येथील बागायत जमिनीला 16 लाख 28 हजार रू., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 14 लाख 20 हजार रु. व माळरान जमिनीला 11 लाख 20 हजार रु. प्रतिएकर दर आहे. तसेच बेनकनहळ्ळी येथील बागायत जमिनीला 16 लाख रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 12 लाख 5 हजार रु. आणि माळरान जमिनीला 8 लाख रु., मंडोळी गावातील बागायती जमिनीला 14 लाख 41 हजार रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 10 लाख 50 हजार रु. तर जमिनीला 8 लाख 70 हजार रु., कल्लेहोळ येथील बागायत जमिनीला 6 लाख रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 5 लाख 10 हजार रु. आणि माळरान जमिनीला 3 लाख 80 हजार रु. प्रतिएकर दर निश्चित करण्यात आला आहे.
याच भागातील बेळगुंदी बिजगर्णी, राकसकोप व कुद्रेमनी या परिसरातील जमिनींचे दर देखील वाढविण्यात आले आहेत. या ठिकाणच्या बागायती जमिनीला 5 लाख 60 हजार रु., पाण्याचा स्त्रोत असलेल्या जमिनीला 4 लाख 85 हजार रु. आणि माळरान जमिनीला 3 लाख 80 हजार रु. प्रतिएकर दर आहे. सध्या हे दर निश्चित करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र या दरांपेक्षा चारपट अधिक दराने जमिनी खरेदी करण्यासाठी चढाओढ सुरू असलेली पहावयास मिळते. परिणामी जमिनीचे दर गगनाला भिडलेले आहेत.