बेळगाव शहर आणि परिसरात तसेच तालुक्यात तिन्ही ऋतू एकत्र अनुभवण्याचा अनुभव सध्या तरी येत आहे. या प्रकारामुळे अनेक जण आरोग्याच्या समस्यामुळे त्रस्त झाले आहेत. तर कधी एकदा हे वातावरण पूर्वीप्रमाणे होईल अशी आशाही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सकाळी धुके दुपारी उन्हाचा अनुभव आणि सायंकाळी परत पावसाने झोडपल्यामुळे अनेक जण त्रस्त झाले आहेत.
सध्या बटाटा रताळे आणि सोयाबीन काढणी खोळंबली आहे. संध्याकाळी दररोज पाऊस पडत असल्याने या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे तर काहींना याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या तिन्ही ऋतूमुळे अनेकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. पहिलाच कोरोना महामारीमुळे हतबल झालेले नागरिक पुन्हा या ऋतूमुळे अडचणीत येणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता दवाखान्यातील गर्दी वाढू लागली आहे तर कोरोना महामारीमुळे याची बळी पडू लागले आहेत.
कधी एकदा हा ऋतु स्वच्छ होईल आणि नागरिकांना पूर्वीप्रमाणे आपल्या कामात गुंतत येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बटाटा आणि रताळी काढणी काही प्रमाणात आटोपती घेण्यात आली असली तरी अजूनही बऱ्याच ठिकाणी ही कामे अर्धवट आहेत. काही ठिकाणी बटाटा जात आहे. त्यामुळे आता तोंडाला आलेले पीक वाया जाणार अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त करण्यात येत आहे तर सध्या भात पीक जोमात आहे.
मात्र उघडत नसल्याने अनेकांना समस्या निर्माण झाले आहेत. त्यामुळे निसर्ग कधी एकदा पूर्वीप्रमाणे वातावरण स्वच्छ करेल याकडेच साऱ्यांचे नजरा लागून राहिले आहे.