पिरनवाडी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसण्यावरून वाद निर्माण झाला होता पुतळ्यावरून राजकारण करण्यात आले. आता नुकताच कर्नाटक राज्यातील एका तालुक्यात विरराणी कित्तूर राणी चन्नम्मा आणि राष्ट्रपुरुष संगोळी रायान्ना यांच्या पुतळा बसविण्यावरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद विकोपाला जाऊन हाणामारीचा प्रकार घडला आहे.
कित्तूर राणी चन्नम्मा व राष्ट्रपुरुष संगोळी रायान्ना हे दोघेही इंग्रजांच्या विरोध लढले आहेत. मात्र काही कन्नडिंगना याचे सोयरसूतक नसते. केवळ स्वतःचे नाव आणि वीर पुरूषांचा पुतळ्यावरून वाद निर्माण करण्यातच धन्यता मानत असतात. गदग तालुक्यातील बळगानुर गावात कित्तूर राणी चन्नमा आणि यांचा पुतळा बसण्यावरून वादन निर्माण झाला आहे.
त्या ठिकाणी पहिला राष्ट्रपुरुष संगोळी रायान्ना यांचा पुतळा होता. तो पुतळा नको म्हणून कित्तूर राणी चन्नम्मा यांचा पुतळा बसवण्यात येत होता. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. पंचमशाली आणि हालूमठ या दोन जातींमध्ये हा वाद निर्माण झाला आहे.तर काही राजकीय नेते आपली पोळी भाजून घेण्यासाठी मोठ्या झटापटी करत असल्याचेही उघडकीस आले आहे.
मागील चार ते पाच दिवसापासून संबंधित गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान झालेल्या वादावादीत प्रांताधिकारी आणि डीवायएसपी हे देखील जखमी झाले आहेत. त्यामुळे पुतळा बसवण्याचा वाद आता कर्नाटकातही दिसून येऊ लागला आहे. कित्तूर राणी चन्नम्मा आणि राष्ट्रपुरुष संगोळी रायान्ना हे दोघेही इंग्रजांविरुद्ध एकत्र लढले. मात्र त्यांचे पुतळे बसण्यावरून वादन निर्माण झाला आहे.
महत्त्वाचे म्हणजे सीमाभागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवताना पोटशूळ उठलेल्या कन्नड नेत्याने आता त्या ठिकाणी जाऊन हा वाद मिटण्याची गरज व्यक्त होत आहे.राज्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहनी केली आहे. येथील नागरिकांना एकत्रित बनवून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.