दिवस उजाडला की आपल्या मनात असंख्य विचार येतात परंतु हे विचार सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत हे पाहणे आवश्यक आहे. नकारात्मक विचार आपल्या मना इतकाच शरीरावरही परिणाम होऊन त्याची परिणिती आजारात होते जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी केव्हाही सुदृढ मजबूत मानसिकतेची गरज असते असे विचार संस्कृती एज्युकेअरचे स्वीय प्रशिक्षक व एज्युकेटर तेजस कोळेकर यांनी व्यक्त केले.
संस्कृती एज्युकेअर संस्थेतर्फे “विचारांचा आपल्या मनावर प्रभाव” या विषयावर रविवारी कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जे लोक कमी काळजी करतात ते कमी आजारी पडतात. तुमच्या स्वप्नात सोबत जगा त्यांना मरू देऊ नका.
आपल्या स्वप्नांवर आपणच काम करायला हवे. लोक काय म्हणतील याचा विचार करून आपण आपल्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करतो. आपली स्वप्ने साकार करण्याची क्षमता आपल्यातच आहे. लोक आधी हसतील टीका करतील, पण तुमची स्वप्ने साकार झाली की अचंबित होतील. प्रत्येक यशस्वी माणसाला नकार पचवावा लागतो. त्यामुळे विचार बदला.
तुमच्यातील ऊर्जा वाया घालवू नका. जेंव्हा तुमच्या मनात नकारार्थी विचार येतील तेंव्हा ती त्वरित थांबवा. तुम्ही सर्व कांही करू शकता हे तुम्ही तुमच्या मनाला सांगा, तेंव्हाच तुमचा मार्ग सोपा होईल. स्वतःवर विश्वास नसला की सर्व गोष्टी कठीण होतात असे सांगून सकारात्मक राहण्याच्या अनेक टिप्स तेजस कोळेकर यांनी दिल्या.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर सर्व ती खबरदारी घेऊन आणि सोशल डिस्टंसिंग पाळून सदर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेस नागरिक आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.