जीव कोरोना महामारी मुळे अनेकांना आपला जीव गमावला आहे. मात्र बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील शिक्षकांनी आपला जीव गमावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यात सुमारे 39 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. या महामारी मुळे अनेकांना भीतीच्या छायेखाली वावरत असताना बेळगाव जिल्ह्यातील शिक्षकांना त्याचा फटका बसला आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 22 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 17 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. मागील आठ महिन्यांपासून कोरोना महामारी मुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहे. त्यामध्ये मंत्री आमदार खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना ही कोरोनाने आपल्याला आपल्या वेढ्यात घेतले आहे. मात्र शिक्षकांनाही याचा मोठा त्रास झाला असून या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यातील 39 शिक्षकांना कोरोनामुळे मृत्यूशी झुंज देत आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यानच्या काळात अजूनही काही शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर नुकतीच सुमारे 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
ही घटना बेळगाव जिल्ह्यातील असून तर त्याच शाळेतील सहा शिक्षकांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती उपलब्ध झाली होती. दरम्यानच्या काळात अशीच परिस्थिती राहिली तर शाळा सुरू करावी की नाही हा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारने अजून तरी शाळा सुरू करू नये अशीच मागणी व्यक्त होत आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 22 आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 17 असे एकूण 39 शिक्षकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे यापुढे तरी कोरोनाचे गांभीर्याने दखल घेण्याची गरज परिसरात व्यक्त होत आहे.