मायकल जॅकसन सारखं डान्स करत मेक अप करुन पब मध्ये जाणारी रॅम्बो डार्लिंग ही नव्हे…केवळ वासाने गुन्हे गारांचा शोध घेणारी रॅम्बो डार्लिंग बेळगाव पोलीस दलाच्या श्वान पथकात आहे.
कायदा आणि सुव्यवस्था भागाचे डी सी पी विक्रम आमटे यांनी श्वान पथकाच्या पोलीस अधिकाऱ्यांसह केक कापुन या रॅम्बो डार्लिंगचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय.
श्वान दलातील इतर सदस्यांना देखील रॅम्बोच्या बर्थ डे निमित्त केक भरवण्यात आला पोलिसांनीही केक खाल्ला जन्म दिना निमित्त रॅम्बोला नॉन व्हेजची मेजवनीही पोलिसांनी दिली.
पोलीस दलात सर्वांची लाडकी असलेल्या रॅम्बोच बर्थ डे सेलेब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.अनेक गुन्ह्यांचा शोध लावण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रॅम्बोचा वाढ दिवस करत पोलिसांनी या मुक्या प्राण्या बद्दल आदर व्यक्त केलाय.टीम बेळगाव live कडून देखील हॅपी बर्थ डे रॅम्बो…
केवळ जन्म दिनीचं नव्हे तर दररोज रॅम्बोला जेवणात आवडीचे नॉन व्हेज डिश मिळू देत हीच प्रार्थना..