Friday, December 20, 2024

/

रेल्वे ओव्हर ब्रिजवर गळफास लावून इसमाची आत्महत्या

 belgaum

गोगटे सर्कलनजीकच्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या रेलिंगला गळफास लावून एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

मयत इसमाचे वय अंदाजे 50 ते 55 वर्षे असून त्याने रेल्वे ओव्हर ब्रिजच्या रेल्वे स्टेशनच्या दिशेने असलेल्या रेलिंगला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी ब्रिजच्या ठिकाणी ये -जा करणाऱ्या नागरिकांना ब्रिजवर लटकणारा मृतदेह आढळून येताच एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच ब्रिजवर लटकत असलेला मृतदेह खाली उतरवून घेतला.

रेल्वे रुळा शेजारी गवतात ठेवलेला हा मृतदेह पाहण्यासाठी आज सकाळी ब्रिजवर बघ्यांची गर्दी झाली होती. सकाळी उशिरापर्यंत मयत इसमाची ओळख पटलेली नव्हती. सदर घटनेची रेल्वे पोलीस स्थानकात नोंद झाले असून अधिक तपास सुरू आहे.Suicide bridge

दरम्यान, आत्महत्येच्या या घटनेमुळे गोगटे सर्कल नजीकचा रेल्वे ओव्हर ब्रिज पुन्हा चर्चेत आला आहे. सदर ब्रिजच्या उभारणी नंतर सातत्याने सातत्याने काही ना काही अशुभ व अनुचित घटना घडत आहेत.

प्रारंभी या ब्रिजचा एका बाजूचा भरावा ढासळला होता. त्यानंतर एका बाजूचा रस्ता खचला होता. यासारख्या प्रकारांमुळे मध्यंतरी काही काळ हा ब्रीज रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आता हा रेल्वे ओव्हर ब्रिज आत्महत्येचा स्पॉट बनू पहात आहे. एकंदर या ब्रिजच्या बांधकामाचा मुहूर्त चांगला लागला नसल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.