राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स (आरजीयुएचएस) या विद्यापीठातर्फे बेळगांव शहरात लवकरच प्रादेशिक केंद्र तथा क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती आरजीयुएचएसचे उपकुलगुरू डॉ. एस. सच्चिदानंद यांनी दिली आहे.
नियोजित क्रीडासंकुल हे बेळगांवसह मंगळूर, कलबुर्गी व दावणगिरी येथे सुरू करण्यात येणाऱ्या राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्सच्या चार प्रादेशिक केंद्रांपैकी एक असेल, असेही उपकुलगुरू डॉ. सच्चिदानंद यांनी सांगितले.
नेहरूनगर बेळगांव येथील केएलईएस जेएनएमसी आवारात आरजीयुएचएसचे प्रादेशिक केंद्र असणार आहे.
या केंद्रांमध्ये डिजिटल मूल्यमापन, सिम्युलेशन, फिजिओथेरपी संशोधन व दंत संशोधन केंद्रे त्याचप्रमाणे डिजिटल ग्रंथालय आणि सभागृहाची सोय असणार आहे.