Saturday, January 4, 2025

/

नाल्याच्या “या” बॅकवॉटर समस्येकडे लक्ष देण्याची मागणी

 belgaum

शास्त्रीनगर दुसरा क्लास आणि न्यू गुडस् शेडरोड येथील नाल्याच्या बॅक वॉटरमुळे परिसरातील गटारी तुंबण्याबरोबरच घरांच्या टॉयलेट -बाथरूममध्ये सांडपाणी शिरत आहे, तरी संबंधित खात्याने याकडे तात्काळ लक्ष देऊन ही समस्या दूर करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

शास्त्री नगर 2 रा क्रॉस व न्यूगुडशेडरोडचा नाला शुक्रवारी तासाभराच्या मुसळधार पावसात भरुन वाहू लागल्याने नाल्याच्या बॅकवॉटरमुळे परिसरातील गटारीत पाणी भरले. त्याचप्रमाणे आजुबाजूच्या घरात पाणी जाण्याची वेळ आली. तसेच कांही घरांच्या टाॅयलेट/बाथरूममध्ये ड्रेनेजचे पाणी भरले.

मागील मुसळधार पावसाप्रसंगी देखील हाच प्रकार घडला होता. याला पूर्णतः महानगरपालिकेचे पीडब्ल्यूडी व हेल्थ डिपार्टमेंटचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांना वारंवार निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. उपरोक्त प्रकारामुळे या भागातील नागरिकांच्या विशेष करून लहान मुले व वृद्ध मंडळींच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

तेंव्हा जनक्षोभ उसळण्याची वाट न पाहता वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालून उपरोक्त समस्या दूर करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.