पोलीस भवनमधील पहिल्या मजल्यावर कर्मचाऱ्यांना साप दिसला आणि सर्वांची एकच घाबरगुंडी उडाल्याची घटना आज मंगळवारी घडली.
शहरातील पोलीस भवनमधील पहिल्या मजल्यावर कर्मचाऱ्यांना साप दिसला. तेथे महिला कर्मचारी असल्याने सर्वजण भयभीत झाले व लगेच सर्पमित्र आनंद चिट्टी यांना पाचारण करण्यात आले. अडगळीच्या ठिकाणी हा सर्प गेल्याने सुमारे तासभर प्रयत्न करून चिट्टी यांनी या सापाला ताब्यात घेतले.
आनंद चिट्टी यांनी सापाला ताब्यात घेताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सुमारे 3 फूट लांब धामण जातीचा हा सर्प असून हा बिनविषारी असतो.
उंदीर हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. पोलीस भवन येथे उंदरांचा वावर वाढला असावा त्यामुळे भक्षाच्या शोधात हा सर्प वरपर्यंत आला होता. हा सर्प लहान असल्याने सापडण्याची शक्यता कमी होती पण तो एकाच ठिकाणी बसला होता त्यामुळे तो दृष्टीस पडला व त्याला पकडता आलं असे सर्पमित्र चिट्टी यांनी सांगितले.
एस पी ऑफिसमध्ये सापडला साप-पोलीस कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास-सर्प मित्र आनंद चिट्टी यांनी दिले दिलं सापाला जीवदान-
#belgaumlive
#snakefoundspoffice
#SuperintendentOfPolice
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1244322112592046&id=375504746140458