बेळगाव शहरातील स्मार्ट सिटी बस स्थानक अनेक प्रकाराने चर्चेत येते. अस्वच्छता दुर्गंधी आणि बरेच काही त्यामुळे स्मार्ट सिटीची अवस्था सुधारणार कधी असा प्रश्न वारंवार निर्माण होतो. मात्र आता स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसथांब्यावर कोणती बस किती वाजता येणार आहे याचे लाईव्ह स्टेटस आता नागरिकांना दिसणार आहे.
पुणे मुंबई यासारख्या शहरांमध्ये अशी व्यवस्था आहे. तशीच व्यवस्था बेळगाव येथील बसस्थानकावर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल असून नागरिकांना समजण्यासाठी आता कोणत्या भाषेत हे फलक दिसणार याकडे उत्सुकता लागून आहे.
बेळगाव शहरातील स्मार्ट सिटी बस स्थानकांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात पाऊल उचलण्यात आले असून आता लाईव्ह स्टेटस दिसत असल्याने नागरिकांची सोय होणार आहे. कोणती बस कुठे जाणार आहे आणि ती किती वाजता येणार आहे हे दिसणारे फलक बस थांब्यावर झळकणार आहेत.
शहरातील महत्त्वाच्या बसथांब्यावर प्रारंभी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुरूवारपासून या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
बेळगाव शहरातील अनेक बस थांबे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली होती. मात्र त्यांचा विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कामाला सुरुवात करण्यात आली. आता या बस थांब्यांवर लाईव्ह स्टेटस दिसणारे फलक लावून नागरिकांची सोय करण्यात येत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेतून विकासाचे पहिले पाऊल पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून आता अनेक कामांना गती देण्यात आली असली तरी प्रारंभी बसस्थानक आणि तेथील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहेत. यासंबंधी स्मार्ट सिटी योजनेचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी गुरुवारपासून या कामाला सुरुवात होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.