बेळगांव रोलर स्केटिंग अकॅडमी आणि प्रेरणा पी. यु. कॉलेज, बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने “फिट इंडिया -स्ट्रॉंग इंडिया” अंतर्गत आयोजीत बेळगांव ते जांबोटी आणि जांबोटी ते बेळगांव अशी भव्य स्केटिंग, सायकलिंग आणि रनिंग (धावणे) रॅली आज सकाळी अपूर्व उत्साहात यशस्वीरित्या पार पडली.
गोवावेस स्विमिंग पूल येथे आज सकाळी 7 वाजता प्रमुख पाहुणे सीआरपीएफच्या कोब्रा स्कूलचे उपप्रमुख गौरव कुमार यांच्या हस्ते ध्वज दाखवून “फिट इंडिया -स्ट्रॉंग इंडिया”च्या या भव्य रॅलीचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी गिरीश दंडण्णावर, रो. अशोक काडापुरे, जगत शंकरगौडा, उमेश कलघटगी, योगेश कुलकर्णी, विजय पाटील, कमलकिशोर जोशी, डी. बी. पाटील राजू माळवदे आदी मान्यवर उपस्थित होते. या भव्य रॅलीमध्ये 12 वर्षापासून 60 वर्षे वयोगटातील 45 स्पर्धकांचा सहभाग होता.
बेळगांव ते जांबोटी पर्यंतच्या या रॅलीचा परतीचा मार्ग जांबोटी, किणये, मच्छे, पिरनवाडी, उद्यमबाग, तिसरे रेल्वे गेट, दुसरे रेल्वे गेट, आरपीडी कॉर्नर मार्गे प्रेरणा पी. यु. कॉलेज बेळगांव असा होता. विशेष म्हणजे हे अंतर रॅलीतील सहभागी सर्व स्पर्धकांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले.
मच्छे नजीक शांताई वृद्धाश्रमाच्या ठिकाणी रॅलीतील स्पर्धकांना अल्पविराम देण्यात आला होता. याठिकाणी सर्व स्पर्धकांना फळे पाण्याच्या बाटल्या आणि धाम पुसण्यासाठी नॅपकिन्स देण्यात आले. प्रारंभी शांताई वृद्धाश्रमाच्यावतीने धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व माजी महापौर विजय मोरे यांनी रॅलीत सहभागी स्केटर्स, सायकलपटू आणि धावपटूंचे स्वागत केले.

रॅलीतील स्केटिंग प्रकारात श्री रोकडे, प्रथणम राज, करुणा वाघेला, अमेय याळगी, यशवर्धन परदेशी, श्रेया वाघेला, सृष्टी होन्नणगी, रोशन नरगोडी, रुपेश भोसले, आदर्श निकम, देवन बामणे, भक्ती हिंडलेकर, यशपाल पुरोहित व खुशी जी. या स्केटर्सचा सहभाग होता. सायकलिंग प्रकारात गिरीश दंडण्णावर, रघुराम, रवी मुतनाळ, विवेक रघुराम, अमोघ कळ्ळीमठ, कृष्णा शर्मा, संजय मुतनाळ, राम घोरपडे, लक्ष्मिकांत खोतगी, समय भट, ऋषिकेश कोल्ली, भरत पाटील, नागेंद्र पाऊसकर, डॉ. संतोष कठारे, व डॉ. किरण खोत यांचा समावेश होता. त्याप्रमाणे धावणे प्रकारात निरंजन पाटील, रवी भैरवाडगी, मंजुनाथ अळवणी, संगमेश, भरतेश पाटील, शैलेंद्र वर्मा, अजित पाटील, प्रणय कुगजी, दिगंबर देसुरकर, मोहम्मद कैफ आणि मोहम्मद समीर या धावपटूंचा सहभाग होता.
या सर्व स्पर्धकांनी रॅलीचे येण्याजाण्याचे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले. रॅली दरम्यान वैद्यकीय उपचारासाठी डॉ. बसवराज मेटगुड यांच्या नेतृत्वाखाली डॉ. संतोष पठारे, कु. प्रवीणा, कु. सविता, नागराज, कु. जास्मिन व कु. सुधा यांचे वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले होते.