Monday, December 23, 2024

/

आत्मविश्‍वास- वाचा डॉ सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

‘खुद ही को कर बुलंद इतना की, हर तकदीर से पहले खुदा बंदे से पुछे बता तेरी रजा क्या है?’ असा एक उर्दू शेर आहे. माणसाच्या आयुष्यातील ही एक उच्चतम स्थिती आहे. आत्मविश्‍वास बुलंद असेल, लाथ मारीन तिथं पाणी काढीन अशी जिद्द असेल तर माणूस काय नाही करू शकणार? आत्मविश्‍वास बळावर रंकाचे राव बनणारे अनेकजण असतात. कोणत्याही आधाराशिवाय, पैशाच्या पाठबळाशिवाय स्वतःच्या हिंमतीवर पुढे येणार्‍या व्यक्ती खर्‍या जिद्दी!

परंतु आत्मविश्‍वास नसेल तर मात्र साधीसाधी कामं करायलासुध्दा डगमगायला होते. हातून कोणतेही काम पार पडत नाही. घरी, शाळेत, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी, कॉलेजमध्ये अशी अनेक उदाहरणे असतात. कित्येक रूग्ण आत्मविश्‍वास वाढवण्यासाठी पुष्पौषधी घेऊन जातात. त्यांना निश्‍चितच फायदा होतो.
सतीश अगदी लहानपणापासूनच जरा लाजराबुजरा, तोंड उघडून बोलायचीसुध्दा तसदी घेणार नाही. मुखदुर्बळ जमातीमध्ये फिट्ट बसणारा! घरातून बाहेरसुध्दा पडणे त्याला नको असायचे परक्यांशी चार शब्द बोलणे तर दूरच! घरी कोणी पाहुणे आल्यावर ओळख करून देण्यासाठी बोलावले की हा मागच्या दाराने बाहेर किंवा बाथरूममध्ये लपणार . शाळा, कॉलेजमध्ये सुध्दा याला कोणी मित्र नव्हते. मैत्रिणी तर दूरचं. मुलींशी बोलायचे अशा नुसत्या विचारानेच सतीशला घाम फुटायचा! याला कारण सतीशच्या घरातले वातावरण. मुलाला अतिशय सुरक्षित वातावरणात वाढवण्यामागे सतीशची आई कारणीभूत होती. वडिलांनी त्याचा बुजरेपणा कमी करण्याचे बरेच प्रयत्न केले.Confidect

परंतु त्याची आई ’जाऊ द्या हो एकुलता एक आहे. लेकरू एकटं कुठं जाईल! त्याच्या हातान कसं होईल! तो कसं करेल!’ असे म्हणत सतीशला कायम पाठीशी घालत राहिली. त्यामुळे सतीश असा बुळा, पळपुटा झाला. कसेबसे शिक्षण संपवून एका खासगी कंपनीत नोकरीला लागला. तेथेही भिडस्त स्वभावामुळे वरचेवर बोलणी खावी लागत. धडाडी नसल्यामुळे जेमतेम पगार मिळत असे. खरी पंचाईत झाली लग्न ठरवताना. मुलगी बघायला गेल्यावर मुलीने हातात कपबशी दिल्यावर याचेच हात थरथरायला लागले.

मुलीनेच मुलगा नाकारला. तेव्हा मात्र सतीशला समजून चुकले की आपल्याला आत्मविश्‍वास मिळवण्यासाठी वैद्यकीय मदत घ्यावी लागणार. त्याला पुष्पौषधीने पुष्कळ फायदा झाला. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला येणे, व्यक्तिमत्व ठाशीव असणे यासाठी आत्मविश्‍वास लागतोच. काही कारणास्तव तो गमावला असल्यास पुष्पौषधींची निश्‍चित मदत होते. अपघात झाल्यानंतर वाहन चालवण्याचा आत्मविश्‍वास जाणे, नोकरीच्या ठिकाणी, सासरच्या ठिकाणी सततच्या खच्चीकरणामुळे आत्मविश्‍वास गमावणे, कुटुंबीयांच्या टोमण्यांमुळे आत्मविश्‍वास ढासळणे, भीतीमुळे आत्मविश्‍वास कमी होणे यावर होमिओपॅथी व पुष्पौषधी अशा परस्परपूरक उपचारांमुळे निश्‍चित फायदा होतो. काही वेळेला अनावश्यक दडपणामुळेसुध्दा आत्मविश्‍वास ढासळतो.

एक पेशंट बँकेमध्ये काम करणारे होते. असिस्टंट मॅनेजर होते. काही दिवसांकरिता बँकेतील मॅनेंजर ट्रेनिंगसाठी जाणार असल्यामुळे त्यांचा चार्ज या गृहस्थांना मिळाला. त्याचदिवशी त्यांना डायरिया चालू झाला. ते बँकेत जाऊच शकले नाहीत. असा इमोशनल डायरिया फक्त दडपणामुळेच होतो. आत्मविश्‍वास खच्ची झाल्यामुळे होतो. अशा रूग्णांना पुष्पौषधी हे वरदान आहे. आत्मविश्‍वास कमी असणार्‍या व्यक्तींना अ‍ॅनिमिया, अकारण सर्दी, इमोशनल डायरिया (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम- आयबीएस), कमरेच्या तक्रारी, स्वप्नदोष, झोपच्या तक्रारी असे विकार- आजार होऊ शकतात.
www.thebachflower.com
9916106896
9964946918

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.