विद्यार्थ्यांचे संरक्षण हे आमचे पहिले प्राधान्य असून राज्यात अजून शाळा-महाविद्यालये सुरु करण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे मत शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे पालकांनी कोणतीही काळजी करून नये असा सल्ला त्यांनी दिला आहे.
बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना शिक्षणमंत्री म्हणाली कि, केंद्र सरकारने राज्य सरकारला परिस्थितीची माहिती घेऊन शाळा सुरु करण्याचे निर्णय घेण्याची सूचना केली आहे. परंतु राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सध्या शाळा सुरु करण्यासारखे वातावरण नाही. शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून, त्यानंतरच शाळा महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेणार येईल, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारने नववी ते बारावी पर्यंतच्याविद्यार्थ्यांना २१ सप्टेंबरपासून शाळा – महाविद्यालयांना भेटी देता येतील. तसेच अभ्यास, अभ्यासपूर्वक उपक्रमांसंदर्भात शिक्षकांची भेट घेऊन मार्गदर्शन घेता येईल, असे स्पष्ट केले होते.
मात्र नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासविषयक मार्गदर्शनासाठी १५ ऑकटोबरपर्यंत शाळांना भेटी देता येणार नाही, असे सरकारने आदेशात स्पष्ट केले असून कर्नाटकातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालये सुरु करण्यासाठी १५ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे.