Thursday, December 26, 2024

/

मालमत्ता दरात बेळगांव उत्तरमध्ये नेहरूनगर अग्रस्थानी

 belgaum

बेळगांव शहराप्रमाणेच सर्व प्रकारच्या सुखसुविधा आणि सोई उपलब्ध असल्यामुळे आता उपनगरांचे महत्त्व देखील वाढले आहे. शहराच्या आसपास 25 हून अधिक उपनगरे असून त्यातील 8 ते 10 उपनगरे महत्त्वाची आहेत. या महत्त्वाच्या उपनगरांमध्ये मालमत्ता दराच्या बाबतीत नेहरूनगर अग्रस्थानी आहे.

मध्यवर्ती शहरात जागा आणि इमारती महागड्या झाल्याने स्वतंत्र जमिनी खरेदी करून उपनगरे वसविण्यात आली. मात्र मालमत्ता दराच्या बाबतीत शहराचे अविभाज्य अंग बनलेल्या या उपनगरांची परिस्थिती आता शहराप्रमाणेच झाली आहे. नेहरूनगर येथील निवासी मालमत्तांचे दर 2,320 रु. प्रति चौरस फूट तर व्यापारी मालमत्तेचा दर 3,248 रु. प्रति चौरस फूट आहे. यापाठोपाठ जाधवनगर येथील निवासी मालमत्तेचा दर प्रति चौरस फूट 2,270 रु. आणि व्यापारी मालमत्तेचा दर 3,178 रु. प्रति चौरस फूट इतका झाला आहे.

शिवबसवनगर येथील निवासी मालमत्तेचा दर 2,100 रु. प्रति चौरस फूट आणि व्यापारी मालमत्तेचा दर 3,400 रु. प्रति चौरस फूट आहे. हनुमाननगर येथील निवासी मालमत्तेचे बाजार मूल्य 1,980 रु. तर व्यापारी मालमत्तेचे बाजार मूल्य 2,772 रुपये प्रति चौरस फूट इतकी आहे. त्याचप्रमाणे वीरभद्रनगर येथील निवासी मालमत्तेचा दर 1,870 रु. आणि व्यापारी मालमत्तेचा दर 2,960 रु. प्रति चौरस फूट पाहायला मिळतो.Nehru nagar

नेहरूनगर आणि शिवबसवनगर ही एकमेकांना जोडलेली उपनगरे आहेत. तथापि तुलनेत शिवबसवनगर येथील व्यापारी मालमत्ता महागड्या ठरत आहे. या भागात शाळा, महाविद्यालयं, रिसर्च सेंटर आणि इतर व्यावसायिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले गेल्याने मागील 10 -15 वर्षात येथील जागांचे दर वाढले आहेत. या नगरांसह विश्वेश्वरय्यानगर व रेलनगर येथील निवासी मालमत्तेचा दर 2,000 रु. प्रति चौरस फूट तर व्यापारी मालमत्ता 2,800 रु. प्रति चौरस फूट आहे. सदाशिवनगर येथील निवासी मालमत्तेचे दर 1,900 रु. तर व्यापारी मालमत्तेचे दर 2,660 रु. प्रति चौरस फूट आहे. याचबरोबर गांधीनगर येथे निवासी मालमत्ता 1,700 रु. प्रति चौरस फूट तर व्यापारी मालमत्ता 2,380 रु. प्रति चौरस फूट इतक्‍या दरात उपलब्ध आहे. न्यू गांधीनगर येथील रहिवासी मालमत्तेचा दर 1,050 रु. प्रतिचौरस फूट तर व्यापारी मालमत्तेचा दर 1,470 रु. प्रति चौरस फूट इतका आहे.

शिवाजीनगर येथील निवासी मालमत्तेचा दर 2,530 रु. आणि व्यापारी मालमत्तांचा दर 2,420 रु. प्रति चौरस फूट आहे. वैभव नगर येथील निवासी मालमत्तांचा दर 1,870 रु. आणि व्यापारी मालमत्तांचा दर 2,960 रु. प्रति चौरस फूट झाला आहे. हिंडलगा -विजयनगर येथे रहिवासी मालमत्तांचा दर 1,590 रु. तर व्यापारी मालमत्तांचा दर 2,226 रु. प्रति चौरस फूट आहे. अंजनेयनगर येथील निवासी मालमत्तांचे दर 1,710 रु. तर व्यापारी मालमत्तांचा दर 2,400 रु. प्रति चौरस फूट झाला आहे. अशोकनगर येथील निवासी मालमत्तांचा दर 1,440 रु. तर व्यापारी मालमत्तांचा दर 2,016 रु. प्रति चौरस फूट आहे. सुभाषनगर येथे निवासी मालमत्तांचा दर 1,530 रु. तर व्यापारी मालमत्तांचा दर 2,142 रु. प्रति चौरस फूट आहे.

लक्ष्मी टेकडी या परिसरातील जागांच्या किंमती वाढल्या आहेत. मुद्रांक आणि नोंदणी खात्याने येथील रहिवासी मालमत्तांचा दर 2,050 रु. तर व्यापारी मालमत्तांचा दर 2,870 रु. प्रति चौरस फूट इतका निश्चित केला आहे. टीव्ही सेंटर परिसरातील निवासी मालमत्तांचे दर 2,140 रु. तर व्यापारी जागांचे दर 3000 रु. प्रति चौरस फूट झाले आहेत. मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाने उपरोक्त दर निश्चित केले असून पुढील वर्षभरानंतर पुन्हा या दरांमध्ये वाढ होणार आहे. दरम्यान, प्रत्यक्षात जे दर ठरवले जातात त्यापेक्षा अधिक दराने खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. मात्र नोंदणी विभागाने निश्चित केलेल्या दरावरच प्रत्येकाकडून कर आकारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.