यंदा कोरोना प्रादुर्भावाची संकट असल्यामुळे पंत बाळेकुंद्री (ता. बेळगांव) येथील श्री पंत पुण्यतिथी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सालाबादप्रमाणे पंत बाळेकुंद्री येथे पंत पुण्यतिथी उत्सव येत्या दि. 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. तथापि यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार साध्या व सांकेतिक स्वरूपात पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.
यासंदर्भात दत्त संस्थांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते उत्सव साधेपणाने व सांकेतिक स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत अमराई परिसरात हा कार्यक्रम होणार आहे.
यावर्षी उत्सव साजरा होणार नसल्यामुळे उत्सवासाठी कोणीही श्री क्षेत्री येऊ नये. भक्तांनी हा उत्सव आपापल्या घरी नियोजित तारखे दिवशी श्रद्धेने साजरा करावा, असे आवाहन श्री दत्त संस्थान बाळेकुंद्री यांच्यातर्फे करण्यात आले आहे.