कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळांकडून मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला ऑनलाईन शिक्षण पद्धतीला अनेकांचा विरोध होता. परंतु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षण देण्याचे ठरविले. यादरम्यान स्मार्ट फोनवर अभ्यासक्रम पाठविण्यात येत असल्यामुळे सातत्याने मोबाईल पाहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची गंभीर दखल राज्य शासनाकडून घेण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे याबाबतचा अहवालहि मागविण्यात आला असून अहवाल येताच त्वरीत निर्णय घेण्यात येणार आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा अद्याप बंद असल्या मुलांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या हेतूने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा अवलंब केला जात आहे. सरकारच्या सूचनेवरून ऑनलाइन शिक्षणाची सोय करण्यात आली.
मोबाईल फोनच्या स्क्रीनवरील ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी गुंतून पडल्यामुळे शालेय मुलांच्या डोळ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सतत मोबाइलला खिळून राहिल्याने मोबाईल फोनच्या प्रकाशित स्क्रीनमधून होणाऱ्या कांही घातक किरणोत्सर्जनामुळे मुलांच्या डोळ्याला त्रास होत असल्याचे मत जाणकारांनी मांडले आहे.
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या डोळ्यांना त्रास होत असलेल्या तक्रारीची गंभीर दखल सरकारने घेतली असल्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी आज दिली आहे.