बेळगाव पोट निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांची यादी मोठी आहे याचाच अर्थ पक्ष वाढला आहे. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्या नंतरच निवडणुकीची तयारी सुरू केली जाईल असे मत राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी व्यक्त केले आहे.
शनिवारी सायंकाळी भाजप कोअर कमिटी बैठकीसाठी ते बेळगावला आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
बेळगाव भाजप लोकसभा पोट निवडणुकीसाठी इच्छुकांत समतोल ठेऊन उमेदवाराची निवड केली जाईल इच्छुकांचे समाधान करण्याची क्षमता भाजपमध्ये आहे त्यांचे समाधान करून बेळगाव लोकसभा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तुम्ही साहसी आहात तर सी बी आय च्या कारवाईला का घाबरता असा सवाल त्यांनी डी के शिव कुमार यांना विचारत फटकारले आहे. सी बी आय धाडी मागे राजकारण नाही का या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे.
सी बी आय ही स्वतंत्र संस्था आहे काँग्रेस काळात लालूप्रसाद राबडीदेवी यांच्या वर देखील धाडी पडल्या होत्याअसे कुटील म्हणाले.
मी अद्याप निवृत्त झालो नाही- कोरे
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक बाबत माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी मनोगत व्यक्त करत मी अद्याप निवृत्त झालो नाही असे म्हणत पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवू स्पष्ट करत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त आहे.
कोणताही प्रश्न आला तर कोरे यांचे नाव समोर येते मात्र कोणत्याही युवकाला तिकीट दिल्यास हरकत नाही मात्र मी अद्याप पोलिटिक्स मधून रिटायर्ड झालो नाही असे त्यांनी नमूद केलं.बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीची उमेदवारी कुणाला द्यावी हा हाय कमांडचा प्रश्न आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.