प्रसिद्ध सिने संगीतकार के. कल्याण यांच्या पत्नीसह सासू सासऱ्यांच्या अपहरणातील दोन आरोपींपैकी एका आरोपीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला शिवानंद वाली हा मांत्रिक आणि के. कल्याण यांच्या घरी घरकाम करणारी महिला गंगा कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान मांत्रिकाला मागील आठवड्यात जामीन मिळाला होता. या प्रकरणातील गंगा कुलकर्णी या घरकाम करणाऱ्या महिलेने विष प्रश्न करून आत्महत्या केली आहे.
या प्रकरणाच्या उपरोक्त दुसऱ्या प्रकरणातही या महिलेचा संबंध होता. काही वर्षांपूर्वी गंगा कुलकर्णी हिने कोप्पळ जिल्ह्यातील कुष्टगी गावातील अनेक लोकांकडून सरकारी नोकरी देण्याचे सांगून पैसे उकळले होते.
याच प्रकरणी आज गंगा कुलकर्णी यांना कोप्पळच्या कुष्टगी येथील न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु न्यायालयात येण्यापूर्वीच गंगा कुलकर्णी हिने विष प्राशन केले होते. न्यायालय आवारात येताच गंगा कुलकर्णी कोसळली असता तात्काळ या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाने तिला मृत घोषित केले.